अवैध दारू विक्रेत्यांचा तुफान गोळीबार, बेछूट ५ ते ६ गोळ्या झाडल्या, जळगाव एमआयडीसीतील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव एमआयडीसी मध्ये (औद्योगिक वसाहत) परिसरात रविवार रोजी अवैध दारू विक्रेत्यांने राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहमद फिरोज शेख (वय २६) या दोघांवर अवैध व धंद्याच्या वादातून जी सेक्टरमधील एका प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कंपनीबाहेर गावठी पिस्तुलातून बेछूट ५ ते ६ गोळ्या झाडल्या. यात हे दोघे तरुण कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेली माहिती अशी की, सरफू शेख नावाचा कामगार रात्री उशिरा कंपनीत नाईट ड्युटीसाठी जात होता. त्यावेळी कंपनीजवळच्या टपरीवर अवैध दारू विक्रेता एका व्यक्तीला मारहाण करत होता. सरफूने ही घटना पाहिली असता, दारू विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्याने सरफू शेख याने मदतीसाठी आपले भाऊ, राजन आणि अहमद यांना कंपनीबाहेर बोलावले. त्या नंतर सरफू शेख आणि त्याचे भाऊ आल्यावर दारू विक्रेत्याने त्यांनाही शिवीगाळ केली. यानंतर तेथे हजर असलेल्या एका महिलेने त्याला गावठी पिस्तूल काढून दिले. पिस्तूल मिळताच आरोपीने संतापाच्या भरात कामगारांवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि तो फरार झाला.
पोलिसांची तातडीची कारवाई गोळीबाराच्या या गंभीर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटने नंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली.

