भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

डोळ्यात स्प्रे मारून गळ्यातील ८ तोळ्यांची सोन्याची चेन लुटली

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्यांनी स्प्रे मारून बांधकाम व्यावसायीकाच्या गळ्यातील ८ तोळ्यांची सोन्याची चेन जबरीने लुटून नेल्याची घटना जळगाव मधील मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर घडली.

जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायीक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. मोहाडी रोड) हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ते पुन्हा ईच्छादेवी चौफुली मार्गे पायी घराकडे येत असताना मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर आले.

दुचाकीवरून तोंडाला मफलर बांधलेला इसम खाली उतरला व त्याने खूबचंद साहित्या यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने साहित्या यांना मारहाण केली. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ८ तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढून घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!