भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शहरात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडली, चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात काल गुरुवार दिनांक २६ जून रोजी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार दुकानांना एकाच रात्रीत लक्ष्य केले. या चार दुकानांपैकी तीन दुकानांमधून मोठा ऐवज लांबवला असून, चौथ्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. तेथे चोरी झाली नहीं. एकाच रात्री तब्बल चार दुकाने फोडल्याने रावेर शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चोरट्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात चार दुकाने चोरट्यांनी फोडली. महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या ‘न्यू मनोज जनरल स्टोअर्स’चे कुलूप तोडून चोरी केली, तर शेख सादिक यांच्या ‘युनिक किराणा स्टोअर’चे शटर वाकवून चोरी केली. तसेच भूषण कोळी यांच्या ‘महादेव मेडिकल’चे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तर शरीफभाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी, त्यांच्या दुकानातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याची माहिती आहे.आज सकाळी सकाळी हा संपूर्ण प्रकार समोर येताच,सर्वत्र खळबळ उडाली. व परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.

रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त असताना चोऱ्या कशा होतात. असा प्रश्न केला जात असून या घटनेने पोलिसांच्या कार्य पद्धतीवर शंका  उपस्थित केल्या  जात आहे. या घटनेमुळे रावेर शहरातील रात्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!