गोवंश जातीचे मांस जप्त, रावेर पोलिसांची मोठी कारवाई
रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | प्रतिबंधित असलेल्या गोवंश जातीचे सुमारे ५५ किलो मांस रावेर तालुक्यातील रसलपूर येथून रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत जप्त केले आहे. या प्रकरणी शेख हुसेन याला अटक करण्यात आली असून शेख हुसेन आणि शेख इसाक या दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील रावेर येथून जवळच असलेल्या रसलपूर येथे प्रतिबंधित असलेल्या गोवंश जातीच्या मांसाची अवैध विक्री होत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रावेर पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत गोवंश जातीचे सुमारे ५५ किलो मांस रावेर तालुक्यातील रसलपूर येथून जप्त केले.
या पूर्वीही अनेक वेळा रावेर पोलिसांनी अवैध गोवंश जातीचे मांस जप्त केले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गोवंश जातीचे मांस विक्री सुरू असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे . या प्रकरणाचा
पुढील तपास रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.


