रावेरसामाजिक

रावेर तालुक्यातील गोलवाडे गावातील तिघं जिवलग मित्रमुंबई पोलीस दलात रवाना……

गोलवाडे ता. रावेर मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी| रावेर तालुक्यातील गोलवाडे गावातील तिन्ही जिवलग मित्र मुबंई पोलीस दलात रवाना झाले आहेत.

रावेर तालुक्यातील गोलवाडे एक छोटसं गाव आहे. पण छोट्याशा गावाची किमया फार न्यारी आहे. महाराष्ट्र पोलीस दलात पहिल्याच भरतीत तिघही जिवलग मित्रांचे सिलेक्शन झाले. मोहित हिरामण बेलदार. निखिल निवृत्ती तायडे. लीलाधर रमेश धनगर. हे असे यांचे नाव आहे.

या गोलवाडे छोट्याशा गावातील जवळपास १०० ते १५० पोलीस दलात व भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये सेवा देत आहे या छोट्याशा गावाची किमया अशी आहे की, सण १९९९ पासून चालत आलेली परंपरा अजूनही तशीच चालत आहे.

म्हणजेच की सन १९९९ पासून प्रत्येक वर्षाला पोलीस दलात किंवा सैन्य दलात चार-पाच मुले लागत आहे. या गावातील मुले खूप मेहनत व परिश्रम अभ्यास आणि त्यांच्या अंगात असलेली लगान खूप वेगळी आहे या गावातील मुलांनी स्वतः स्वखर्चाने स्वामी विवेकानंद अकॅडमी ओपन केली आहे. त्या अकॅडमी मध्ये शिकवायला सुरुवात श्री गणेश चांगदेव तायडे यांनी केली आज रोजी ते मुंबई पोलीस दलात सेवा देत आहे तसेच आज रोजी सर्व विद्यार्थी मित्र एकमेकांना शिकवून त्यांच्या अडचणी दूर करतात. रात्रभर अभ्यास करणे सकाळ संध्याकाळ रनिंग करायला जाणे. हे या गावातील मुलांची बारावी महिने चाललेली परंपरा चालू आहे तसेच त्यांचा आत्मविश्वास व ध्येय पोलीस दल सैन्यदल यामध्ये प्रयत्न सतत चालू आहे.

सन १९९९ ते २०२५ असं एकही वर्ष गेले नाही की त्या वर्षात एकही मुलगा पोलिस दल किंवा सैन्यात भरती झाला नाही. आज या छोट्याशा गावात या तिघही जिवलग मित्र पोलीस दलात रवाना झाले गावातून खूप जल्लोष मध्ये ढोल ताशा च्या गजरात त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, मित्र मंडळी मोठ्या प्रमाणावर निरोप देण्यासाठी हजार होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!