भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

दोन दुचाकी व ओमानी कार च्या तिहेरी भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

अमळनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रवासी ओमनी कार  व दोन दुचाक्यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात चोपड्याचे ३ जण जागीच मयत तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील व केवाराम पावरा (वय २५) असे तिघे मयत झाले आहेत. तर टॅक्सी मधील ४ जण जखमी आहेत.

टॅक्सीमधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार (रा.सुरत) याला डॉ. सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत.

चोपडा येथील ६ जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ डी एल ८६९३) व आणखी एका मोटरसायकल वर ट्रीपलसीट चोपडयाकडे निघाले होते. चोपड्या कडून ओमानी टॅक्सी क्रमांक (एम एच १९ वाय १८२८) येत होती. टॅक्सी मध्ये १२ जण होते.आणि समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या. ओमनी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोटारसायकलीची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंग मध्ये अडकले होते. तर दोन्ही मोटारसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या. त्यात दोघे जण जागीच ठार झाले. एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. जखमी विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!