भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर मध्ये गावठी कट्टा रोखून  तिघांना बेदम मारहाण, तिघांना अटक एक फरार

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हॉटेलमधील बिलाच्या वादातूनbजातिवाचक शिवीगाळ होऊन या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्यासह रोखून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवार दिनांक १० जून रोजी रात्री ११ ते ११. ३० वाजे दरम्यान फैजपूर शहरातील सुभाष चौकात घडली. यावेळी हवेत राऊंड ही झाल्याचे घटनेदरम्यान उपस्थितांकडून सांगण्यात आले. शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख व आकिब शेख या चौघांविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, यावल रोडवरील मधुकर सह साखर कारखान्याजवळील हॉटेल तृभावी येथे दुपारी बिलावरून वाद झाला होता. यावेळी हॉटेल व्यवस्थापक सुमित ऊर्फ छोटू मार्तंड साळुंके. रा. फैजपूर. ता. यावल. याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याचा जाब सुमित साळुंके यांनी फोनवरून विचारल्यावर वाद अधिक चिघळला. आणि याचा राग मनात धरून रात्री फैजपूर शहरातील सुभाष चौकात सुमित साळुंके व त्याचे मित्र अमोल तायडे आणि सागर भालेराव यांच्यावर आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू व गावठी कट्ट्याचा वापर करत बेदम मारहाण केली. या वेळी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. या मारहाणीत सुमित, आमिर आणि सागर हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या संदर्भात फैजपूर पोलिस स्टेशनला सुमित साळुंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीं पैकी शेख आरिफ, शाहरुख शेख व आसिफ शेख यांना अटक करण्यात आली आहे तर आकिब शेख फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, यांच्या मार्गदर्शना खाली स. पो.नि. रामेश्वर मोताळे, पी एस आय नीरज बोकील व विनोद गभाने हे पुढील करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!