भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

कर्जाला कंटाळून रावेर तालुक्यातील ३२ वर्षीय युवा शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या

मुंजलवाडी, ता . रावेर. मंडे टु मंडे न्युज. चंद्रकांत वैदकर l एका ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील अजनाड येथे घडली.

रावेर तालुक्यातील अजनाड गावात राहत असलेला युवा शेतकरी योगेश भागवत चौधरी वय ३२ वर्ष. या युवकाने दि. १९/३/२०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजेच्या दरम्यान घरच्या शेतात निंबाच्या झाडाला कर्जाला कंटाळून फाशी घेऊन जिवनयात्रा संपवली.

दरम्यान रात्री त्यांचे मोठे भाऊ यशवंत चौधरी यांनी शोधाशोध केली असता त्यांना शेतामध्ये लटकलेल्या अवस्थेत योगेश चौधरी मिळाले. त्यानंतर त्यांनी अजनाड पोलीस पाटील महेंद्र पाटील उपसरपंच विजय पाटील यांना सांगितले त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला फोन करून कळविले रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!