अवैध वाळू वाहतुक करताना ट्रॅक्टर पकडले, वन विभागाची कारवाई, चालक पसार
पाल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल अभयारण्यातील रावेर तालुक्यातील पाल (वन्यजीव) वन परीक्षेत्रातील परिमंडळ पाल परिसरात दिनाक ७ ऑगस्ट रोजी दुपारी पाल ते गारखेडा रस्त्याने गस्त करीत असताना MH19-BG 4611 या क्रमांकाचे power track 445 DS plus कपंनीचे ट्रॅक्टर ट्रॉली सह अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. वनकर्मचारी यांना पाहताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला.
सदर power track 445 DS plus कपंनीचे MH19-BG 4611 या क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली सह जप्त करून वनपरीक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाईत वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल संभाजी सूर्यवंशी प्रवीण पाटील, वनरक्षक रणधीर काटे, रोहिदास पाटील, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीन तडवी, धनाबाई भादले, आदींचा सहभाग होता.
