जळगाव जिल्ह्यातील १९८ प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल यंत्रणेत मोठा बदल करण्यात आला. १९८ अशा मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.
दि. २६ मे सोमवार रोजी जळगाव जिल्ह्यातील तब्बल १९८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये ५३ सहाय्यक महसूल अधिकारी, ४४ महसूल सहाय्यक (क्लर्क), ३५ मंडलाधिकारी, ५ चालक, आणि ५८ तलाठी यांचा समावेश आहे. तर तलाठी पदावरून तीन जणांची मंडलाधिकारीपदी
पदोन्नतीही यावेळी जाहीर करण्यात आली.