क्राईमयावल

किराणा दुकानावर छापा,अडीच लाखाचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अवैध व राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि गुटखा असा एकुण २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल डीवायएसपी यांच्या पथकाने, यावल तालुक्यातील किनगाव येथील जगन्नाथ विठ्ठल पाटील यांच्या किराणा दुकानातून हस्तगत केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे यावल तालुक्यातील किनगाव येथील जगन्नाथ विठ्ठल पाटील यांच्या अनिल किराणा दुकानावर फैजपूर येथील उपविभागीय पोलीस आधिकारी यांच्या पथकाने दि. ३ मे शुक्रवार रोजी छापा टाकला असता या छाप्यात सुमारे २ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल दुकानात आढळून आला. या संदर्भात किराणा दुकानदार जगन्नाथ विठ्ठल पाटील, वय ५१ वर्ष. रा. पाटील वाडा, किनगाव ता. यावल याच्या विरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी हरीष भोये हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!