पुन्हा त्याच ठिकाणी आमोदा येथे दोन अपघात, ट्रॅक पलटी, 23 केळी कामगार जखमी, ट्रॅव्हल बसची दुचाकीला धडक, 2 जखमी
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथुन जवळच असलेल्या आमोदा येथे आज 2 नोव्हेंबर रोजी सकाळी सावदा येथील गोविंद शेठ यांच्या केळी ग्रुपची गाडी आमोदा येथील मोर नदी पुलावर सकाळी साडे सात ते आठ च्या दरम्यान आयशर गाडी क्रमांक एम एच 43 Y. 05 74 ही गाडी रोझोदा गाते, सावदा,, निंभोरा कळमोदा कोचुर, हिंगोणा, भोकर, खिरोदा, येथील केळी वाहतूक करणारे कामगार होते .या कामगारांना ट्रॅक मध्ये जामनेर येथे केळी काढण्यासाठी घेऊन जात होते. यातच आमोदा येथील मोर नदी पुलावर गाडी पलटी झाली यात 23 कामगार जखमी झाले. त्यांना फैजपूर येथील डॉ खाचणे यांच्या एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी मध्ये सलीम तडवी हिंगोणा, हुसेन तडवी सावदा, संजय पाटील रोझोदा, फिरोज तडवी सावखेडा पवन मेढे रोझोदा, फकीरा तडवी खिरोदा, राजू तडवी रोझोदा, सादिक तडवी, अकसन तडवी हिंगोणा आशिक तडवी हिगोणा, भास्कर मेढे रोझोदा, शादिक तडवी हिगोणा, साकीत तडवी हिगोणा, सुरेखा अटकाडे रोझोदा, संजय अटकाडे रोझोदा, चंद्रकांत तायडे रोझोदा, आशा पाटील रोझोदा, देवराज लहासे भोकरी, अमित तडवी हिगोणा, सरला तायडे रोझोदा, पिंटु तायडे गाते, महेंद्र तायडे कोचुर, सलीम तडवी कळमोदे यांचा समावेश आहे.
त्यात ठिकाणी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि त्याच ठिकाणी केदार लक्झरी गाडी क्रमांक एम एच 19 वाय 57 46 गर्दीतून पुढे काढतांना लक्झरी गाडीने मोटरसायकल क्रमांक एम एच 19 ए डब्ल्यू 94 48 या मोटरसायकलला धडक दिली त्यात वासुदेव फेगडे वय 35 बामणोद व आमोदा (तालुका यावल) येथील किरण पाटील यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांच्या दोघांच्या पायांना जबर दुखावत झालेली आहे. याच ठिकाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी लक्झरी बसचा मोठा अपघात झाला होता
