दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, एकाचा मृत्यू, एक गंभीर
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क|यावल-चोपडा राज्य महामार्गावर यावल तालुक्यातील साकळी गावाजवळ रविवारी संध्याकाळी दोन दुचाकीं वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
राजेन्द्र रमेश सपकाळे. वय ४५ वर्ष, रा. वढोदा ता. यावल हे रविवार रोजी साकळी गावाकडून वढोदा गावाकडे आपल्या (एमएच १९ ईबी ५४४२) या दुचाकीने येत होते. यावेळी वसंत महाजन यांच्या जिनिंगजळील पुलाच्या वळणावर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात राजेंद्र सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
