दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक : दोन तरुणांचा मृत्यू
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर रावेर शहराजवळ बिजासनी माता मंदिराजवळ आज बुधवार दिनाक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात २ दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
अधिक वृत्त असे की, आज दुपारी विनय भालेराव (वय २६) हा आपल्या दुचाकीवरून रावेर कडे जात असताना त्याच वेळी शुभम लोखंडे (वय २०) हा रावेरहून विवऱ्याकडे येत असता रावेर जवळील बिजासनी माता मंदिराजवळ दोघांच्या दुचाकींची जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. तर विनय भालेराव हा गंभीर जखमीं झाला. गंभीर जखमी झालेल्या विनय भालेराव (वय २६ वर्ष). याला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आले मात्र, उपचारासाठी भुसावळ येथे नेत असताना रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.या संदर्भात रावेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
