मुक्ताईनगर मध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, एकाच दिवसात तीन जणांना चावा. नगरपंचायतीकडून मात्र उपायोजना शून्य?
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | मुक्ताईनगर मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून एकाच दिवसात तीन जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. नगरपंचायतीकडून मात्र उपायोजना शून्य असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून रस्त्यांनी ये -जा करणाऱ्या नागरिकांवर तसेच मोटरसायकलीवर जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले असून यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे? कालच संताजी नगर परिसरात भटक्या कुत्र्याने एका अल्पवयीन मुलासह दोन नागरिकांवर हल्ला केला.
कुत्रे पकडण्याचे टेंडर झाले नसल्याची माहिती
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता कुत्रे पकडण्याचे टेंडर निघाले नसल्यामुळे संबंधित व्यक्तीचे बिल निघत नसल्यामुळे कुत्रे पकडायला कोणी तयार नाही? एखाद्याचा जीव गेल्यावर नगरपंचायत प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न मुक्ताईनगर शहरातील नागरिक विचारू लागले आहेत.

