भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलजळगाव

दोन तलाठी ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दोन तलाठ्यांना जळगाव लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

यातील तक्रारदार यांचे उत्राण गिरणा नदीपात्रात यातील
नरेश भारकर शिरूड, तय ४१ वर्ष, व्यवसाय नोकरी, तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल जि. जळगांव. यांनी वाळूचे टॅक्टर भरलेले दिनांक २७/०१/२०२६ रोजी सकाळी पकडलेले होते. सदरचे टॅक्टर नंतर सोडून देण्यात आले होते. सदर वाळूने भरलेले ट्रैक्टर सोडले व कारवाई केली नाही म्हणून तलाठी नरेश भारकर शिरूड यांनी टॅक्टर सोडताना २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. २७/०१/ २०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव येथे तक्रार दिली होती.

सदर तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २७/०१/२०२६ रोजी पंचासमक्ष एरंडोल येथे लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता यातील तलाठी नरेश भारकर शिरूड यांनी तक्रारदार यांचे गिरणा नदीपात्रात वाळूचे भरलेले ट्रक्टर पकडलेले होते. सदर चे टॅक्टर सोडल्याचा मोबदल्यात व कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे २५,०००/- रुपये बिलकुल घेणार नाही. इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहे म्हणून तुझ्याकडून फक्त ३० हजार रुपये घेतोय अस सांगून ३०,००० रुपये लात्तेची मागणी करून शिवाजी एकनाथ घोलप यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

सदर लाच मागणी पडताळणी कारवाई झाल्यानंतर लागलीच सापळा कारवाई आजमावली असता सदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती राहत असलेल्या एका रूम मध्ये यातील शिवाजी एकनाथ घोलप,तलाठी उत्रांण, ता. एरंडोल जि. जळगांव मागणी केलेली लाचेची रक्कम शिवाजी घोलप, तलाठी यांनी तलाठी नरेश शिरुड याचे उपस्थितीत ३०,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

या संदर्भात नरेश भारकर शिरूड, तय ४१ वर्ष, व्यवसाय नोकरी, तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल जि. जळगांव रा. प्लॉट नं. १३, सव्र्व्हे नं. १७९,यू दत्तमंदिरासमोर, वाघ नगर जलगांत (खाते महसुल विभाग वर्ग-३)
૨) शिवाजी एकनाथ घोलप वी ४६ वर्ष तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल रा.रू.नं.०९, पार्थ इलाईट, हरीओम नगर, आटीलरी. सेंटर रोड, नाशिक रोड, नाशिक, मुळ रा. पहुर पेठ, ता. जामनेर जि. जळगांव (खाते महसुल विभाग वर्ग-३) याना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून १,७३,३००/- रुपये रोख रक्कम व २९५०/- रुपये किंमतीची एक Paul John कंपनीची ७५०ml व्हिस्की बॉटल (गिफ्ट रॅपर मध्ये पॅक असलेली) आणि Oppo कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकुर, पोलीस उपाधीक्षक, ट्रैप ऑफिसर श्रीमती रिमता नवघारे, पोलिस इंस्पेक्टर, पी.ओ. हेमन्त नागरे, पी.ओ./पर्यवेक्षक अधिकारी:- श्री योगेश ठाकुर, पुलिस उपाधीक्षक, ट्रैप ऑफिसर श्रीमती रिमता नवघारे, पुलिस इंस्पेक्टर, पी.ओ. हेमन्त नागरे, पी.ओ./प्रदीप पोल, पी.ओ. सूर्यवंशी, पी.ओ./सैटिन, बी.पी.वी.एन.एन.एल.आई.एन
पुलिस इंस्पेक्टर, एल.पी.वी. जलगंज

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!