भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

५० टक्के नफ्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका ६१ वर्षीय सेवा निवृत्त व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ५० टक्के नफ्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव येथे समोर आला.

कमलाकर धोंडू चौधरी (वय ६१, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. ३१ ऑगस्ट २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. आणि त्यांना ‘Astha Trade 833 Education Community’ नावाच्या ग्रुपमध्ये अँड करण्यात आले. त्यांना ‘ACSTRADE’ नावाचे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग अँप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. भरलेल्या रकमेवर ५० टक्के नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी कमलाकर चौधरी यांचा विश्वास संपादन केला.

परंतु जेव्हा कमलाकर चौधरी यांनी आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रक्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे टॅक्स भरण्याच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांवर एकूण १,३५,८५,१८९ रुपये भरून घेतले. मात्र, त्यांना काहीही रक्कम दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

या संदर्भात जळगाव सायबर पोलिस स्टेशनला कुणाल कुमार, नेहा बन्सल, आरव गुप्ता या व्यक्तींच्या विरोधात २७ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!