भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

पंचायत समितीतील दोन तांत्रिक सहाय्यकांना लाच घेताना अटक, लाचलुचपत विभागाची कारवाई

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पंचायत समितीं अंतर्गत  रोजगार हमी योजनेतून विहिरींच्या बांधकामाला दिलेल्या अनुदानाच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेताना शिरपूर (धुळे )येथील दोन तांत्रिक सहायकांना गुरुवारी दिनाक ७ ऑगस्ट रोजी मुद्देमालासह अटक करण्यात आली. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार हे मौजे वकवाड, ता. शिरपुर, जि. धुळे येथील रहिवासी असुन त्यांची मौजे वकवाडे येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदार यांना रोजगारहमी योजने अंतर्गत सन २०२३ २०२४ मध्ये विहिरीसाठी ४,००,०००/- रुपये अनुदान मंजुर झाले असुन सदर विहिरीचे नियमानुसार काम पुर्ण झाले आहे.

सदर मंजुर झालेल्या रकमेपैकी तक्रारदार यांना ५०,०००/- रुपयांचे अनुदान मिळाले असुन उर्वरीत ३,५०,०००/- रुपयाचे अनुदान मिळणे बाकी असल्याने तक्रारदार यांनी पंचायत समिती शिरपुर येथे जावुन अभियंता धिरज भामरे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना अदा केलेल्या अनुदानाच्या मोबदल्यात व उर्वरीत अनुदानाचे बिल मंजुर करण्यासाठी २,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे दि.१९.०५.२०२५ रोजी तकार दिली होती.

सदर तक्रारीची दि.१९.०५.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता धिरज भामरे, तांत्रिक सहायक यांनी तक्रारदार यांना त्यांचे विहिरीचे आधी अदा केलेल्या अनुदानाच्या मोबदल्यात २,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आज दि.०७.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान धिरज भामरे, तांत्रिक सहायक यांनी पंचायत समिती, शिरपुर कार्यालयात तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सौरभ राजेंद्र ठाकरे, तांत्रिक सहायक यांचे मार्फतीने स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन धिरज संजय भामरे, तांत्रिक सहायक, रोहयो, पंचायत समिती, शिरपुर, जि. धुळे व सौरभ राजेंद्र ठाकरे, तांत्रिक सहायक यांचे विरुध्द शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!