ब्रेकिंग : जळगाव मध्ये बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा, ७६ लाखाची सामग्री जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव मध्ये नकली बनावट देशी दारू बनवण्याचा कारखान्यातून तब्बल ७५ लाख ५५ हजार ७०० रुपयांची सामुग्री जप्त करण्यात आली.जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरातल्या के सेक्टर १० मध्ये मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाच्या कंपनीत अवैध रित्या चालणाऱ्या बनावट देशी दारू निर्मिती करताना वा बाटलीत भरताना चार आरोपींना अटक केली.
या कंपनित शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली चक्क बनावट देशी दारू विक्री तयार करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईच्या सूचना दिल्या.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव एम आय डी सी तील के सेक्टर १० मध्ये विविध फ्लेवर्सचे शीतपेय तयार करण्याची मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाने कंपनी सुरू होती. शीतपेय फ्लेवर तयार करीत दाखविण्यात आलेले होते. प्रत्यक्षात येथे टँगो संत्रा या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती. या बाबत ची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली येथे रसायनांपासून ते पॅकेजींगची सर्व सामग्री असून यातून मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करून ते वितरीत करण्यात येत असतात. या माहितीची खातरजमा करून आज जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सकाळी मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या कंपनीवर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यात येथे बनावट दारू तयार करणारी सर्व यंत्रणा तसेच सामग्री आढळून आली. यात तब्बल ७५ लक्ष ५५ हजार ७०० रूपयांची सामग्री जप्त करण्यात आली असून आणखीही बरच काही येथून माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मोठा बनावट मद्यसाठा मिळून आल्याने आंतरराज्य मद्य तस्करांनी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने तापस सुरू आहे.
सदरची कारवाई अधीक्षक डॉ व्ही टी भुकन , डी एम चकोर, निरिक्षक रा उ शू जळगाव, एस बी चव्हाणके, एस बी भगत, सी आर शिंदे,राजेश सोनार,विठ्ठल बाविस्कर,व त्यांचे सहकारी यांनी केली असून तपास उपयुक्त श्रीमती उषा वर्मा , व्हीं टी भूकन व सहकारी करीत आहेत.