बालकावर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीच्या काकाला अटक
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवासी एका ५ वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करीत त्याची हत्या करण्यात आल्याची घटना ६ सप्टेबर रोजी उघडकीस आली. ५ वर्षीय बालक हा ५ सप्टेंबर पासून बेपत्ता होता. शेजारी रहिवाशी असलेल्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (वय २२) या तरुणाच्या घरात मिळून आला होता. त्याने बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा आवळून हत्या करून त्याला जाळून टाकले होते व मृतदेह पोत्यात लपवला होता. या गुन्ह्यात शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरूणास मदत केल्या प्रकरणी तरूणाच्या काकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे.
५ सप्टेंबर रोजी यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एक पाच वर्षीय बालक बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह ६ रोजी शेजारीच राहणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी. वय २२ वर्ष. या तरुणाच्या घरात सापडला होता. चौकशी मध्ये त्या तरुणाने बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. व त्याला जाळून त्याचा मृतदेह पोत्यात लपवला होता. आरोपी शेख शहीद च्या वडलांनीच या घटनेची माहिती पोलिसांना देवून मुलास पोलिसाच्या ताब्यात दिले होते. त्यास १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
गुन्ह्यात सदर आरोपीला त्याचे काका शेख असलउल्ला गुलाम दस्तगीर न्हावी. वय ३५ वर्ष. यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले. तेव्हा दुसरा आरोपी याला देखील पोलिसांनी अटक केली. त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

