भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, IMD कडून येलो अर्लट

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात
मार्च अखेरीस पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे या पावसामुळे तापमानात तात्पुरती घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. ३० मार्च ते २ एप्रिल या काळात येलो अर्लट दिला असून ढगाळ वातावरण कायम राहणार असून, जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे.

आधीच १८ आणि १९ मार्चला झालेल्या पावसामुळे सुमारे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच नव्या पावसाच्या अंदाजाने चिंता अधिकच वाढली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून पाऊस झाल्यास शेतात उभी असलेली मका आणि दादरसह अनेक पिके धोक्यात येऊ शकतात. विशेषतः वादळी वारा सुटल्यास जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या केळीच्या बागांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा काहीसा खाली येईल. गेल्या आठवड्यात अवकाळी सावटामुळे तापमानात घट झाली होती. मात्र या आठवड्यात तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून यामुळे जळगावकर हैराण उकाड्याने हैराण झाला आहे. परंतु आता पुढील संपूर्ण आठवडाभर अवकाळीचे सावट असणार असल्याने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उन्हाचा कडाका कमी असला तरी दमट हवामानामुळे नागरिक हैराण होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जळगाव जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, ३० मार्चपासून पावसाची सुरुवात होऊन २ एप्रिलपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहू शकतो.

आगामी पाच दिवस कसे राहणार जिल्ह्यातील वातावरण?
दिनांक, तापमान आणि वातावरणाची स्थिती
२८ मार्च : ३७ अंश, कोरडे व उष्ण वातावरण
२९ मार्च : ३६ अंश, कोरडे हवामान
३० मार्च : ६ अंश, सकाळी कोरडे, दुपारनंतर ढगाळ वातावरण व काही अंशी पाऊस
३१ मार्च : ३५ अंश, दिवसभर ढगाळ वातावरण दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस
१ एप्रिल : ३५ अंश, वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह पाऊस

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!