Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नशिराबादसामाजिक

नशिराबादच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज’ यांचे नाव,नामफलकाचे अनावरण

मात्र प्रवेशद्वार ते जुना बसस्थानक परिसरातील स्ट्रीट लाईटचा प्रश्न अद्याप प्रलंबित

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद शहराच्या मुख्य प्रवेशद्वारास आदरणीय परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करणारा नामफलक मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला. या निर्णयामुळे नशिराबादकरांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून, शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आता परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या नावाने नवी ओळख प्राप्त झाली आहे.

परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांनी समाजाला दिलेले योगदान, त्यांचे विचार व कार्य यांची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी, या भावनेतून मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नामफलकामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या स्मृतींची कायमस्वरूपी आठवण राहणार आहे.

या महत्वपूर्ण निर्णयासाठी विशेष पुढाकार, सहकार्य आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नशिराबाद नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष पंकज भाऊ महाजन, सर्व विभागांचे सभापती,नगरसेवक-नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.

दरम्यान, मुख्य प्रवेशद्वारापासून जुन्या बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहराच्या मुख्य प्रवेशमार्गाचा परिसर अधिक प्रकाशमय, सुरक्षित आणि सुशोभित करण्यासाठी या मार्गावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

मुख्य प्रवेशद्वाराला परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आल्याने या परिसराचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे नामफलकाबरोबरच प्रवेशद्वारापासून जुन्या बसस्थानकापर्यंतचा संपूर्ण मार्ग प्रकाशव्यवस्थेने उजळून निघावा, परिसराचे सुशोभीकरण व्हावे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेने या प्रलंबित स्ट्रीट लाईटच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराला मिळालेली नवी ओळख आणि त्यास अनुरूप प्रकाशमय व सुशोभित परिसर हीच परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या पावन स्मृतींना अधिक योग्य आदरांजली ठरेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!