जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! “या” शिक्षकांचं थेट निलंबन होणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेत मद्यपान करून किंवा तंबाखू-गुटखा सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करत दोषी आढळलेल्या शिक्षकांना आता थेट निलंबित केले जाणार आहे.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत शिस्त आणि गुणवत्ता यांना अधिक प्राधान्य देण्यासाठी
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता झेडपी शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, यासाठी शिक्षण विभागाने काही विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.आता शाळेच्या शिस्तबद्ध कारभारात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. जे शिक्षक शिस्त पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा करून त्यांची सेवा समाप्ती केली जाणार आहे. वेतनवाढ रोखणे किंवा सेवा समाप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शिक्षकांनी आपली शारीरिक आणि मानसिक शिस्त कायम ठेवणे अत्यंत गरजेचे राहणार आहे.
यानुसार आता मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही शिक्षक गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. शिवाय, शाळेच्या वेळेपूर्वीच शाळा सोडणारे, जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणारे शिक्षक सुद्धा आता नियंत्रणाखाली राहणार आहेत. अशा शिक्षकांवर आता कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, शाळेत मद्यपान करून किंवा तंबाखू-गुटखा सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर कठोर नजर ठेवण्यात येणार असून, अशा शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहणे, शाळेच्या वेळी पूर्वी शाळा सोडून जाणे, जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणे, मद्यपान करून शाळेत येणे, तंबाखू गुटखा सेवन करणे अशा प्रकरणात जे शिक्षक दोषी आढळून येतील त्यांच्यावर निलंबन कारवाई केली जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा