Video। ऐनपुर-खिर्डी नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री पाटील व आ. चंद्रकांत पाटीलांकडून पाहणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर/खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तसेच वादळी पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्याच गावांत शेतीचे तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील व आ. चंद्रकांत पाटील हे अधिकाऱ्यांसह तालुका दौऱ्यावर होते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील ज्या ज्या गावांमधे शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले होते त्या त्या गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतीबांधावर जाउन नुकसानग्रस्त झालेल्या भागातील पाहणी केली.
तसेच ऐनपूर परिसरात संध्याकाळी ठीक पावुने सात ते सातच्या दरम्यान परिसरात सुद्धा प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती बांधावर जाऊन आज दिनांक 29/5/2021रोजी प्रत्यक्ष भेट दिली व अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनेसह विमा काढलेले व विमा न काढलेले पिक असे दोन वेगवेगळ्या याद्या संबंधित अधिकारी भामरे साहेब यांना तयार करण्यास व पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून आश्वासित केले. त्यावेळी तहसीलदार देवगुणे मैडम,कृषि अधिकारी भामरे साहेब संबंधित विभागाचे अधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.