महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका कार्याध्यक्ष पदी विनायक जहुरे यांची नियुक्ती !
रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l खिर्डी तालुका रावेर येथील रहिवासी युवा निर्भीड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. विनायक संजय जहुरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व कार्याची दखल घेत म. रा. पत्रकार संघ राज्यअध्यक्ष गोविंद वाकोडे, संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश उपाध्यश किशोर रायसाकडा, उ.म. महाराष्ट्र भुवनेश दुसाने, उत्तर म. संघटक विनोद कोळी ( शिवा भाई) जिल्हाध्यक्ष सुनील भोळे, ग्रा.अध्यक्ष लक्ष्मण ठाकूर, रावेर ता.अध्यक्ष विजय अवसरमल यांच्या मान्यतेने पत्रकार संघाच्या तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तसेच जहुरे यांनी पत्रकार संघाची ध्येयधोरणे आणि कार्य आपण प्रामाणिकपणे आपल्या कार्यक्षेत्रात पार पाडत पत्रकारांचे मजबूत संघटन उभे करून पत्रकार संघाचे नाव अधिक उज्वल करण्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
निवडीबद्दल म. रा. पत्रकार रावेर संघांचे ता. अध्यक्ष विजय अवसरमल, उ.म.संघटक विनोद कोळी, ऍड.शिवदास कोचुरे, संकेत पाटील, प्रदीप महाराज,, अतुल घंजे सर, संतोष लोखंडे, अनिल असेकर, ग्रा.सदस्य प्रशांत गाढे, शे.मुनाफ, सादिक पिंजारी, ईश्वर महाजन, शे.शरीफ, कांतीलाल गाढे, जितू इंगळे, दिनेश सैमिरे, चंद्रकांत वैदकर, व सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.