Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावरावेर

ब्रेकिंग : जळगांव जिल्ह्यातील रावेर, यावल व भुसावळ तालुक्यातील ८ तरुण लॉरेन्स बिष्णोई आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात

रावेर/यावल. मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि भुसावळ परिसरातील ८ संशयित तरुण लॉरेन्स बिष्णोई आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या तरुणांची कसून चौकशी केली आहे.

एटीएसने राज्यभरात केलेल्या धडक कारवाईदरम्यान जळगावच्या रावेर, यावल आणि भुसावळ येथील ८ तरुणांना ताब्यात घेतले होते.गँग कनेक्शन: या तरुणांचा पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी आणि कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगशी फोनवरून व सोशल मीडियाद्वारे संपर्क झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.प्राथमिक चौकशीनंतर सध्या या संशयितांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संशयितांच्या बँक खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का, याची सखोल पडताळणी एटीएस आणि जिल्हा अँटी टेररिस्ट ब्रँच (ATB) द्वारे सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांशी पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि राजस्थानचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून फोनद्वारे संपर्क झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता या गँगकडून संशयितांच्या बँक खात्यात पैसा आला आहे का? या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एटीएसने शुक्रवारी राज्यात १७५ ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत जळगाव जिल्ह्यात आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

यात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व भुसावळ या तालुक्यातील संशयित आहेत. नाशिक व जळगाव येथील पथकासह व जिल्हा पातळीवरील अँटी टेररिस्ट ब्रँच (एटीबी) यांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथेदोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आठपैकी सात जण हे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचे तर एक जण राजस्थानचा आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगचा फॉलोअर असल्याचे समोर आले आहे.या सोबतच
एटीएसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १० संशयितांची चौकशी केली

जळगाव जिल्ह्यातील रावेर,यावल, भुसावळ तालुक्यातील या आठ संशयितांशीदोन्ही गँगकडून फोनद्वारे संपर्क झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीत फोनवर कितीवेळा संपर्क झाला? काय संवाद झाला. पुढे काय करणार होते? याबाबत प्रश्नांची सरबत्ती करून चौकशी करण्यात आली. यातून अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही. मात्र, आणखी चौकशी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!