जनतेच्या पाठिंब्याने वाढली ताकद : मुक्ताईनगरातील मतदारांचा भाजपच्या भावना ललित महाजन यांना विजयी करण्याचा निर्धार
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगरचा काया-पालट हे व्हिजन घेवून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भावना ललित महाजन यांना मुक्ताई वासियांकडून वाढता पाठिंबा दर्शवला जात आहे. जनतेच्या पाठिंब्याने निश्चितपणे ताकद वाढली असून आपण या निवडणुकीत विजयी होवू, असा विश्वास यावेळी उमेदवार भावना ललित महाजन यांनी व्यक्त केला.
शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने प्रचार रॅलीचा झंजावात सुरु आहे. मतदारांनी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मतदारांचा आशीर्वाद आपल्याला असल्याने निश्चितपणे आपण विजयी होवू, असा आशावाद उमेदवार भाजपा उमेदवार यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला सुरक्षा, शहरातील गुंडशाही, युवकांच्या भविष्यासाठी व मुक्ताईनगरीच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून निश्चितपणे संधी मिळाल्यानंतर उद्भवलेल्या प्रश्नांचा निपटारा करण्या येईल, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ललित महाजन या प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी रॅलीप्रसंगी व्यक्त केला.


