भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा नगरपालिका प्रभाग क्र.१ ‘ब’ च्या भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवार सौ.भावना कोल्हे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ब मधून भाजप शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. भावना एकलव्य कोल्हे या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे . त्यांनी प्रभाग क्र. १ पिंजून काढला असून मतदारांच्या घरोघरी भेटीगाठी घेऊन निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार सौ. भावना एकलव्य कोल्हे यांना जनतेकडून अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या ‘घरोघरी जाऊन ‘ (डोर-टू-डोर) अशा अभियानातून असो वा भव्य प्रचार फेरी असो त्यांना प्रत्येक ठिकाणी मतदारांची गर्दी आणि त्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे.

सौ. भावना एकलव्य कोल्हे यांच्या दूरदृष्टीच्या विचारांना आणि त्यांच्या नियोजित कामाच्या धोरणांना लोकांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला असून, अनेक नागरिक स्वत:हून पुढाकार घेऊन प्रचारात सहभागी होत आहेत. तरुणाईपासून ते वयोवृद्धांपर्यंत, सर्व स्तरांतील नागरिक त्यांना निवडून देण्याचा निर्धार करत आहेत. लोकांचे हे प्रेम आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, होणाऱ्या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यांची निशाणी कमळ ही चिन्ह असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे.

भावना कोल्हे यांच्या “होम टु होम” च्या प्रचाराने मतदारांची त्यांचा प्रत्यक्ष संवाद होत असल्याने मतदारांकडूनही त्यांना निवडून देण्याचे आश्वासन दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून कार्यकर्ते अधिक जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!