पाणीपुरवठा अभियंता ४ हजारांची लाच घेताना जळगाव एसीबी च्या ताब्यात
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चार हजारांची लाच घेताना अमळनेर पाणीपुरवठा विभागातील डेप्यू. इंजिनिअर दिलीप पाटील यास जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पाणीपुरवठा विभागाचे बिल दोन टक्के अदा करण्यासाठी सात हजारांची लाच मागून चार हजार रुपये स्वीकारताना अभियंता दिलीप पाटील यास अटक करण्यात आली.
हकिकत अशी की, यातील तक्रारदार खाजगी ठेकेदार म्हणून काम करतात त्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मौजे व मजरे हिंगोणे, ता चोपड़ा येथे सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापनाचे ३५००/- रुपयांचे काम पूर्ण केले आहे. दि.१३.१०.२०२५ रोजी तक्रारदार हे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग अमळनेर कार्यालयात गेला असता त्यांची सदर कार्यालयातील अभियंता दिलीप पाटील, उपविभागीय अधिकारी यांच साबत भेट झाली, त्यांनी मी वर प्रमाणे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच ३,५५,०००/- रुपयांच काम पूर्ण केल्याचा अहवाल बनवुन दिल्याच्या माबदल्यात एकुण बिलाच्या २ टक्के , (७००० रूपये) लागतील अस बोलुन तक्रारदार यांचेकडुन लाचेची मागणी कली होती परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यान
त्यांनी दिनांक १५.१०.२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगांव पथकाकडे लेखी तक्रार दिली होती. त्याप्रमाणे आज दिनांक १५१०.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता अभियंता दिलीप पाटील यांनी तक्रारदार यांचेकडेस बिलाच्या २ टक्के, (३००० रूपये) लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रूपये लाचेची स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्या प्रमाणे दिनांक १५/१०/२०२० राजी सापळा कारवाई दरम्यान अभियंता दिलीप पाटील यांनी तक्रारदार यांचकडून ४,०००/- रू. लाच रक्कम तक्रारदार यांचे वर नमुद अहवालाच काम करून देण्याचे माबदल्यात बक्षिस म्हणून स्वतः साठी स्वीकारली,
म्हणून दिलीप पाटील यांचविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, सापळा अधिकारी रेश्मा अवतारे, पालिस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार ३) सफी/विलास पाटील, ४) पाहकों/ नरंद्र पाटील ५) पाना/हेमंतकुमार महाल, ला.प्र.वि. नंदुरबार ६) पाकों / राकश दुसान ला.प्र.वि. जळगाव यांनी केली.

