भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

विरोदा परिसरात अवैध सट्टा – मटका.. ! गरीब-सामान्य आर्थिक संकटात, अनेक कुटुंब उद्ध्वस्त

विरोदा, ता. यावल.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | फैजपूर येथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातील विरोदा येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध सट्टा मटका व्यवसायामुळे समाजात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून गरीब व सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.  युवकांना या सट्टा – मटक्याच्या आहारी खेचले जात असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.


गावामध्ये रोजंदारी मजुरी करणारे गोरगरीब लोकही सट्टा मटक्याच्या नादाला लागून आपल्या कष्टाची कमाई गमावतात, परिणामी त्यांच्या संसारात भांडण होणे, वाद आणि आर्थिक संकट निर्माण झाली आहेत. सट्टा मटका रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही ठोच कारवाई होत नसल्यामुळे सट्टेबाजांचे धैर्य वाढले आहे.  कायद्याचा धाक संपल्याने अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी फैजपूर शहरातील पत्रकारांनी पोलिस स्टेशनला निवेदन सादर केले होते या निवेदनात तात्काळ सट्टा मटका बंद करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु अजूनही प्रशासनाद्वारे कोणतीही ठोस कारवाई होत नाही आहे तात्काळ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध सट्टा मटका बंद करण्यात यावा अशी नागरिकांची व विशेष करून महिलांची मागणी आहे….. (१)…..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!