भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

हवामानाचा लपंडाव, राज्यावर दुहेरी संकट : कडाक्याच्या उन्हा सोबत आता अवकाळी पावसाचे संकट ; जळगाव जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हवामान विभागाने जळगाव सह १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १८ ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

१९ ते २१ एप्रिल दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विशेषतः ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे जळगाव जिल्हा होरपळून निघत आहे. जिल्ह्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असतानाच आता अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आजपासून (१८ एप्रिल) आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २१ एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला होता. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा प्रचंड वाढला आणि नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या.जळगावचे तापमान शुक्रवारी ४२.३ अंशांवर राहिले. मात्र, असे असले तरी तापमान दोन अंशांपेक्षा अधिक म्हणजेच ४४ अंशांच्या पुढे होते. त्यामुळे उन्हाच्या झळा असह्य झाल्या.

दरम्यान आता जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, अवकाळी पावसा उष्णतेच्या लाटेतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊ शकते.  आगामी दोन तीन दिवस तापमान ३९ ते ४३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता असून रात्रीचे किमान तापमान हेही ३० अंशांवर पोहोचणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!