ब्रेकिंग : आठ हजारांची लाच घेताना दोन वनपाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | शेतकऱ्यांकडून सागाच्या झाडांची खरेदी करण्यासाठी लागणारी परवानगी मिळवून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला वनपालासह दोन वनपालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आज दिनांक २ जुलै रोजी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा तालुक्यात केली.
तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील रहिवासी असून, सागाच्या झाडांची खरेदी-विक्री यांचा व्यवसाय करतात. त्यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे गावातील एका शेतकऱ्याशी सागाची झाडं तोडण्यासाठी ६०,००० रुपयांची रक्कम ठरवून सौदा केला होता. झाडं तोडण्यासाठी उपवन विभाग पारोळा येथून परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्याने तक्रारदारांना अधिकृत पत्र दिले होते. सदर परवानगी मिळवून देण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील (रा. देवपूर, धुळे, सध्या मोडाळा, ता. पारोळा) वर्ग ३ . यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदाराने सदर तक्रार दि. १९ जून २०२५ रोजी लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार त्याच दिवशी पडताळणी करत वनपाल दिलीप पाटील यांनी लाच मागणीची कबुली दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. त्या नुसार बुधवार दि. २ जुलै रोजी पारोळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात तक्रारदाराकडून वनपाल दिलीप भाईदास पाटील (रा. देवपूर, धुळे, सध्या मोडाळा, ता. पारोळा) यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यासह कार्यरत असलेल्या वनपाल वैशाली गायकवाड (रा. चोरवड, ता. पारोळा) यांनी पंचासमक्ष ८ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
या कारवाईत आरोपी वनपाल दिलीप भाईदास पाटील (रा. देवपूर, धुळे, सध्या मोडाळा, ता. पारोळा) यांना ताब्यात घेण्यात आले असून दुसरे आरोपी वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड, वय ३८, व्यवसाय वनपाल, वर्ग ३. चोरवड , ता. पारोळा, रा.पारोळा जि. जळगांव. नेमणूक वनपरिक्षेत्र कार्यालय पारोळा. हिला नोटीस देऊन मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर ला.प्र.वि. जळगाव. यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने व पोकों अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे आणि अप्पर . अधीक्षक मा. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

