भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास गैरवापर: प्रशासनाचे दुर्लक्ष !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या गोरखधंधा शहरासह मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून घरगुती गॅस हंड्यांचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला असून चारचाकी वाहनांमध्येही या गॅसचा सर्रास वापर केला जात आहे. या प्रकाराकडे पुरवठा विभाग व प्रशासन डोळेझाक करत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहे? असा सवालही उपस्थित होत आहे.

मुक्ताईनगर शहरामध्ये घरगुती गॅस हंडी चा वापर चार चाकी तीन चाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे पुरवठा विभाग का काना डोळा करत आहे मुक्ताईनगर शहरांमध्ये विविध ठिकाणी असे काही पॉईंट आहे त्या ठिकाणी चार चाकी व तीन चाकी वाहनांमध्ये गॅस मारून दिले जातात या अशा ठिकाणी जर काही गॅसचा स्फोट झाला तर याला जबाबदार कोण राहणार ? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. प्रशासन की असे अवैधरित्या गॅस भरून देणारे याबाबत प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्नचिन्ह नागरिकांसमोर उपस्थित होत आहे घरगुती गॅस सिलेंडर महागण्याचे हेही कारण आपण नाकारू शकत नाही परंतु एवढे गॅस सिलेंडर कसे काय यांच्याकडे उपस्थित होतात हाही गंभीर प्रश्न नागरिकांच्या मनाला उपस्थित होत आहे नेमके हे घरगुती गॅस सिलेंडर कोण पुरवत असेल ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरणे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण शहरातील काही ठिकाणी चारचाकी वाहनांमध्ये थेट घरगुती गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. अशा ठिकाणी जर कुठल्याही कारणामुळे स्फोट झाला, तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. यात प्राणहाणीही होऊ शकते.

पुरवठा विभाग, गॅस एजन्सीसह स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद

या अवैध गॅस साठ्याला आणि वितरणाला जबाबदार नेमके कोण? गॅस एजन्सी हे सिलेंडर बाहेर विकते की स्थानिक पंटर त्यात सामील आहेत? नागरिकांमध्ये याबाबतही संभ्रम आणि चिंता आहे. प्रशासन व पुरवठा विभाग यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर बाजार फिरत असताना कोणीही याकडे लक्ष का देत नाही, हेच खरे गूढ आहे.

प्रशासन कारवाई करणार का? या सर्व प्रकारांकडे प्रशासन नेमके कधी लक्ष देणार? का एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुक्ताईनगरमधील सुज्ञ नागरिक व महिला मंडळांनी याबाबतची मागणी केली आहे की, अशा अवैध गॅस साठ्यांवर तात्काळ छापा टाकून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सध्या तरी प्रशासन शांत आहे, परंतु जनता मात्र अस्वस्थ आहे. या मुद्दयावर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर मुक्ताईनगरमध्ये कधीही मोठा स्फोट होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत पावले उचलून प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

अवैधरित्या घरगुती गॅस हंड्याचा साठा करणाऱ्यांवर व अवैध साठा वापरणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करून नागरिकांना मोकळा श्वास देणार का अशी चर्चा नागरिक करत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!