महिलेकडून व्यावसायिकाची ७ लाख ३० हजारांची फसवणूक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मार्केटिंग करणाऱ्या व्यावसायीकास स्टॉक मार्केट शी संबंधित ॲप्लिकेशन डाऊनलोड करा ,आणि भरपूर नफा कमवा. असे आमिष दाखवून एस एम आर्या आनंद नामक महिलेने ७ लाख ३० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला.
जळगाव शहरातील ३८ वर्षीय व्यावसायिक शहरात मार्केटिंग करतात दिनांक २ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान त्यांच्या मोबाईल व्हॉट्सॲप द्वारे एस एम आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधून काही व्हॉट्स अप वार मेसेज पाठविले व व्हिडिओ कॉल करत संवाद साधत एका लिंक द्वारे स्टॉक मार्केट शी संबंधित ॲप्लिकेशन डाऊनलोड करायाला लावले. असे वेळोवेळी व्यावसायिकाच्या खात्यातून ७ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्या नंतर मात्र व्यावसायिकाला ना नफा ना मुद्दल दिले. व संपर्कही बंद केला. व फोनही उचलत नाही. आपली फसवणूक झाल्याची व्यावसायिकाची खात्री झाल्याने व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या नुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत .