यावल तालुक्यात तरुणीचा विनयभंग
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका बावीस वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .
यावल तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीचा त्याच गावात राहणारा नितीन सुरेश कोळी याने एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून तिचा १ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास रस्ता आडवून मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम व संबंध ठेव अशी म्हटले असता याला तरुणीने नकार दिल्याच्या कारणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १२ मार्च रोजी रात्री आरोपी नितीन सुरेश कोळी याच्यावर यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.