विरोदा येथे आज कानिफनाथ महाराज यात्रोत्सव
विरोदा, ता.यावल. किरण पाटील l यावल ताुक्यातील विरोदा येथे आज सालाबादप्रमाणे कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाडे ओढण्यासाठी बामणोद येथील रहिवासी तुळशीराम सोनवणे सन्मानित यांचे विरोदा नगरीत आगमन झाले असून दि.१२ मार्च साडेतीन वाजेच्या सुमारास देवकाठी नवरात्र मिरवणूक काढण्यात येईल
सदर मिरवणूक कोळीवाड्यातून निघून विठ्ठल मंदिर, पाटील वाडा, चौधरी वाडा या मार्गरथ निघून ठीक ठिकाणी देवकाठी पूजन करण्यात येईल मिरवणूक मध्ये भगत तुळशीराम सोनवणे महाराज व भक्ताचे बगले भागवत कोळी, अशोक सोनवणे भुरा बऱ्हाटे , किरण पाटील . असतात तर अशोक वारके हे हुक सांभाळतात गावाला प्रदक्षिणा मारल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विरोदा , बामनोद रस्त्यावर बारा गाड्या तुळशीराम सोनवणे व भक्ताच्या हातून ओढली जाते . यावेळी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील , सरपंच जीवन तायडे , उपसरपंच विनोद झाल्टे , ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थांनी केले आहे.