अंजाळे मोर नदीत बुडून गुरेढोरे चराई साठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु
चितोडा,ता.यावल. मंडे टु मंडे न्युज किरण तायडे l यावल तालुक्यातील अंजाळे या गावात मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटरचे पाणी या ठीकाणीच्या गावातील शेतकरी गुरचराई साठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात तोल जावुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अंजाळे तालुका यावल येथील राहणारा सुनिल दिलीप बादशाह वय ३० हा दिनांक १८ मार्च रोजी गावातील परिसरात असलेल्या नदीपात्र परिसरात गुरे चराईसाठी गेला असता म्हैसीला नदीपात्रातुन बाहेर काढत असतांना त्याचाच पाय घसरल्याने तोल गेला आणी तरुण खोल पाण्यात बुडाला ही सदरची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी मोर नदीकडे धाव घेत तरूणास पाण्यातुन बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णाण्यात आणले येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मरण पावलेला तरूण हा सुनील दिलीप बादशाह शेतकरी कुंटुबाचा असुन, हा तरूण आपले गुरेढोरे चारण्यासाठी मोर नदीच्या पात्राजवळ आला असता, शेळगाव बॅरेजच्या बॅकवाटर पाण्यात बुडून मरण पावला . त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या गुराख्याने सदर ची माहिती गावकऱ्यांना देवुन गावातील पोहणाऱ्यांच्या मदतीने सुनिल बादशाह याला पाण्यातून त्याला बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या बाबत यावल पोलीस ठाण्यात भरत बादशहा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे. मयत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा,सात महिन्याची मुलगी आहे .