भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

कॉपी प्रकरणी केंद्रप्रमुख,उपकेंद्र प्रमुख, व मुख्याध्यापका सह चौघांवर गुन्हा दाखल

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या एस एस सी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहेत. शासनाने कॉपी मुक्त अभियान राबविले आहे.अशातच यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयातील केंद्र प्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक ६ चे पर्यवेक्षक एस. एस. सोनवणे, मुख्याध्यापक जी. एन. खान या चौघांच्या विरोधात कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहे, येथे गुरुवार दि.७ मार्च रोजी  इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास कॉपी मुक्त अभियान अंतर्गत या परीक्षा केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या साहयक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी तपासणी केली असता या केंद्रावर गैरप्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांना एका ब्लॉक मधील विद्यार्थिनी कॉफीचा कागद बाहेर फेकाताना दिसून आली असता, स पो अ अन्नपुर्णा सिंग यांनी थेट परीक्षेचे परिक्षा निरिक्षक, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके  यांना यावल पोलिसस्टेशन ला बोलाऊन  परिक्षा केंद्रावर सुरू असलेल्या गैरप्रकराबाबत फिर्याद देण्यास लाऊन त्यांच्या फिर्यादी वरून केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक ६ चे पर्यवेक्षक एस. एस.
सोनवणे, मुख्याध्यापक जी. एन. खान या चार जणांवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ७,८ कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे   पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कां .राजेंद्र पवार करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!