भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यात दोन तरुणांच्या गळफास घेऊन आत्महत्या

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका ३३ वर्षीय तरुणाने मोहराळा येथे आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीला आली तर दुसरी घटना यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील गावठाण जागेवर असलेल्या आदिवासी वस्तीत ही घटना घडली.

उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील (वय-३३, रा. मोहराळा ता.यावल) असे मृत तरूणाचे नाव असून तो आपल्या आई व भावासह राहत होता. त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. रविवारी १३ ऑगस्ट रोजी त्याची आई शेतात कामाला गेली. त्यावेळी तो घरी एकटाच होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी त्याची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आल्याने तिने एकाच हंबरडा फोडला. दरम्यान मयत भोजु पाटील यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. मयताचे भाऊ यशवंत पाटील रा. यावल यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तसेच दुसरी घटना यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील गावठाण जागेवर असलेल्या आदिवासी वस्तीत ही घटना घडली.

मुकेश नरसिंग बारेला (१७, रा. डांभुर्णी ता. यावल) असे मयत तरुणांचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहतो. गावठाण जागेवर आदिवासी वस्ती असून या वस्तीतील त्याच्या घरी असताना गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थांनी वस्तीवर धाव घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. यावल पोलीस ठाण्यात दोन्ही घटना प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!