यावल पंचायत समितीचा वरीष्ठ सहाय्यक सिकंदर तडवी एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती वेतन निश्चिती व उपदान मिळण्यासाठीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्या कामी मोबदला म्हणून तिन हजार रुपयांच्या लाचेची मागणी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहाय्यक सिकंदर सायबु तडवी यांनी केली .
या प्रकारची तक्रार एसीबी कडे केल्याने यावल येथील पंचायत समिती कार्यालयात तिन हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून सादर कारवाई एसीबीचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांच्या पथकाने सदर कारवाईत सहभाग घेतला.