१८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ केले व्हायरल, खरात नंतर आणखी एक धक्कादायक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाशिक मधील भोंदू अशोक खरात नंतर राज्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या परतवाडा
शहरांमध्ये एकाने प्रेमाच्या जाळ्यात ळे ओढून अनेक युवतींचे लैंगिक शोषण ल केल्याची घटना सोमवारी समोर आली. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. भाजपने सुमारे १८० हून अधिक मुलींचे ३५० व्हिडिओ असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक मधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण गाजत असतानाच हा नवा व प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
या घटनेतील संशयित आरोपीने युवतींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वतःच चित्रित केले होते. हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणींची असहायता स्पष्टपणे दिसून येत असल्याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्याने अनेकींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात केवळ एकच आरोपी नसून, त्याचे काही साथीदारही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परतवाडा प्रकरणाबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी
निवेदनात महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन युवकांवर गंभीर आरोप केले असून, त्याआधारे पोलिसांनी तातडीने चौकशी चक्रे फिरवली आहेत. सध्या दोन्ही संशयित आरोपींचा शोध सुरू असून, ते ताब्यात आल्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये त्यांचे चित्रीकरण केले जाते. यातील अनेक मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट रचला जात असून, विरोध करणाऱ्या मुलींना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे.
आरोपी कुटुंबासह पसार
हे पाशवी कृत्य चव्हाट्यावर येताच संशयित आरोपी कुटुंबासह घरातून पसार झाला आहे. सध्या त्याच्या घराला कुलूप असून, पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अद्याप कोणतीही पीडिता समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओ हाच पुरावा मानून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला असून तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असूनही पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? असा सवाल अनिल बोंडे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना विचारला आहे. त्या नंतर व्हायरल व्हिडीओंची सायबर क्राइम विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, व्हिडीओ हटवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पीडितांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. गरज पडल्यास महिला अधिकारी पीडितांचा जबाब नोंदवणार आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्यास पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे दाद मागावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखावा,’ असे आवाहन अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

