भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनशिराबाद

नशिराबादमध्ये उघडी तलवार घेऊन दहशत; पोलिसांकडून तरुणास अटक

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे || नशिराबाद येथील ताजनगर परिसरात हातात उघडी तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. शेख अल्ताफ शेख रऊफ (वय २८, रा. ख्वाजा गरीब नगर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांना १६ ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ताजनगर परिसरात एक इसम हातात उघडी तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांसमक्ष संबंधित परिसरात सापळा रचला.

यावेळी माहितीतील वर्णनाशी मिळताजुळता एक इसम हातात उघडी तलवार घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शेख अल्ताफ शेख रऊफ असे सांगितले.त्याच्याकडून सुमारे ३३ इंच लांबीची, मूठ असलेली जुनी वापरती लोखंडी तलवार, अंदाजे किंमत १ हजार १०० रुपये, जप्त करण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, प्रशांत विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, प्रकाश कोळी, भरत बाविस्कर, समीर सैयद, पंकज सोनवणे आणि सागर बिडे यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!