भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकपुणेमहाराष्ट्र

वाघोलीतील रीवाह रेजन्सी सोसायटीत नवरात्रोत्सवात महिलांचा विशेष सहभाग

पुणे. वाघोली.मंडे टू मंडे न्युज. प्रतिनिधी. योगेश पाटील ||
वाघोली येथील रीवाह रेजन्सी सोसायटीमध्ये सोसायटीचे चेअरमन सचिन कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात सोसायटीतील महिलांनी विशेष सहभाग नोंदवत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढवली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये देवीची पूजा-अर्चा, सामूहिक आरती तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, गरबा-रास आणि भक्तिगीतांमुळे सोसायटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेअरमन सचिन कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीतील रहिवाशांना एकत्र आणत सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यावर भर दिला जात आहे. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे नवरात्रोत्सवाला विशेष शोभा प्राप्त झाली असून, महिलांच्या कलागुणांना व नेतृत्वाला प्रोत्साहन मिळत आहे.

महिलांच्या एकजुटीचे आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडवणारा हा नवरात्रोत्सव रीवाह रेजन्सी सोसायटीमध्ये आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण करत आहे. अशा उपक्रमांमुळे सोसायटीतील रहिवाशांमधील स्नेहबंध अधिक दृढ होत असून, सांस्कृतिक परंपरा जपण्याचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!