Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

प्रेमविवाहाच्या वादातून तरुणावर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला ; आठ जणांविरुद्ध गुन्हा, दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून चौघां विरोधातही गुन्हा दाखल

वरणगाव.मंडे टु मंडे न्युज || प्रेमविवाहाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात घडली. १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता कमानीजवळ एका तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद; तरुणावर हल्ल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ संजय माळी (वय २४, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून १२ ऑक्टोबरच्या रात्री सिद्धेश्वर नगरातील कमानीजवळ संशयितांनी त्यांचा भाऊ कृष्णा संजय माळी याच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोपान पंडित धनगर, पवन संजय धनगर, धीरज संजय धनगर, निर्मलाबाई बापू धनगर, मिराबाई संजय धनगर, सागर बापू धनगर, मयूर भागवत धनगर आणि निलेश राखुंडे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सागर, पवन आणि धीरज यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

दुसऱ्या गटाकडूनही तक्रार; चौघांविरोधात गुन्हा

दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पवन संजय धनगर (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर) यांच्या फिर्यादीवरून हर्षल राजपूत, कृष्णा संजय माळी, गोपाळ संजय माळी आणि शुभांगी गोपाळ माळी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार, संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला फायटर तसेच स्टीलच्या कड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या दुसऱ्या प्रकरणाचा तपास ग्रेडेड उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने वरणगावातील या घटनेबाबत पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!