रावेर तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू, ४ जखमी
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनांक 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून एका मेंढपाळ तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेत शिवारात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजेच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला असताना मुंजळवाडी शेती शिवारात
रावेर तालुक्यातील लालमाती येथील मेंढपाळ दादाराव सोना (सोनू) कोळपे वय २० वर्षे या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच ४ मेंढपाळ करणारे व्यक्ती सुद्धा जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून त्यांचावर रावेर येथे उपचार सुरू आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

