बोलॅरो गाडी व दुचाकीची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
निंभोरा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बाघोदा बु ते वडगाव च्या दरम्यान बोलॅरो पिकअप व मोटारसायकल ची धडक होऊन मोटारसायकल चालक विकास शशीकांत धांडे रा रोझोदा ता. रावेर वय २८ वर्ष. यांचा अपघातात मृत्यू झाला.
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रहिवाशी विकास शशीकांत धांडे यांची मोटरसायकल व बोलॅरो पिकअप मध्ये धडक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात पीएम साठी दाखल करण्यात आले. याघटनेने रोझोदा गावावर शोककडा पसरली आहे.
