आनंदाची बातमी ; कोरोना तपासणी अहवालात सावदावासीयांनां दिलासा !
सावदा ता.रावेर(प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतांना दिसून येत आहे, मध्यंतरी सावदा शहरातही कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता, मात्र आता सावदा शहरात कोरोनाचा प्रभाव आधी पेक्षा कमी झालेला दिसत असून तीन दिवसाआधी शहरातील तरुण डॉक्टर दाम्पत्यास कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते.
शहरात दाम्पत्य बाधित आढळून आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, सदरील तपासणी अहवाल प्राप्त झाले असून दिलासादायक अशे की त्यांच्या संपर्कातील सर्व ९ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सावदा वासीयांना हे मोठे दिलासा देणारे वृत्त आहे. सदरील वृत्ताने शहर वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून कोरोनाची साखळी तोडण्यात सावदा वासीयांना यश आल्याचे आज तरी दिसून येत आहे. ही बाब शहरवासीयांना मोठा दिलासा देणारी आहे, परंतु योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.