भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

कोरोनिलवरून योगगुरू बाबा रामदेव भडकले; विरोधकांवर साधला निशाणा !

बाबा रामदेव यांनी करोनिल औषधावरून त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. पतंजलीने कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी योग्य काम केले आहे असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. पतंजलीने योग्य दिशेने काम करणे सुरू केले याची प्रशंसा करा असे मी म्हणत नाही आम्हाला सत्काराची चाड नाही. मात्र बदनामीही करू नका. आमच्या या औषधामुळे केवळ ७ दिवसात करोनाचे १०० टक्के रुग्ण बरे झाले. आम्ही आधुनिक शास्त्रानुसारच काम केल्याचे बाबा रामदेव म्हणाले.

नवी दिल्ली:

पतंजली आयुर्वेदचे योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधावरून देशभरात सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ज्या प्रमाणे देशद्रोह्यांवर तसेच दहशतवाद्यांच्या विरोधात तक्रारी, प्रकरणे दाखल केली जातात, तशा प्रकारे माझ्यावर देशरात एफआयआर दाखल करण्यात आले. काही लोकांनी देशात घाणेरडे वातावरण बनवण्याचे काम सुरू केले आहेत, असा हल्लाबोल करत आम्ही तयार केलेल्या औषधाती रितसर परवानगी घेऊन आणि शास्त्रीय मापदंडांचे पालन करूनच संशोधन आणि निर्मिती केल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी ही माहिती दिली.

स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण आम्ही गेली ३५ वर्षे आमची सेवा देत आहोत. एका सामान्य अशिक्षित आई-वडिलांच्या घरी जन्माला येऊन आचार्य बालकृष्ण येथपर्यंत आले आहेत. माझ्यावर आक्षेप असेल तर मला शिव्या द्या. मी शिव्या खातच आलो आहोत. मात्र जे करोनाने पीडित आहेत त्यांच्याबाबत सहानुभूती बाळगा. गेल्या ३ दशकांमध्ये भारतातील आम्ही १० ते २० कोटी आणि जगभरातील कोट्यवधी लोकांना योग आणि आयुर्वेदाद्वारे मदत केली आहे. आम्ही कोणता गुन्हा केला?, आम्ही जगातील कोट्यवधी लोकांना जीवन दिले आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.

‘आयुष मंत्रालय म्हणते पतंजलीचे काम चांगले’

पतंजलीने कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी योग्य काम केले आहे असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. पतंजलीने योग्य दिशेने काम करणे सुरू केले याची प्रशंसा करा असे मी म्हणत नाही आम्हाला सत्काराची चाड नाही. मात्र बदनामीही करू नका. आमच्या या औषधामुळे केवळ ७ दिवसात करोनाचे १०० टक्के रुग्ण बरे झाले. याचा संपूर्ण डेटा आम्ही आयुष मंत्रालयाला पाठवले आहेत. या चाचण्यांदरम्यान सर्वात मोठा धोका आमच्या फुफ्फुसांना असतो. एक विषाणू आत गेल्यावर आपला संसर्ग कसा पसरवतो हे पाहा. तो आपल्यासारखे हजारो लाखो विषाणू तयार करतो. हे औषध सरकारने बनवलेल्या नियमांच्या अधीन राहूनच या औषधावर आम्ही संशोधन केले आहे. क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचे संपूर्ण संशोधन आम्ही आयुष मंत्रालयाला दिलेले आहेत. आमच्याकडे ५०० शास्त्रज्ञ संशोधन करत असल्याचेही बाबा रामदेव म्हणाले.

धोतीवाले संशोधन करू शकत नाहीत का?

फक्त टाय आणि सुटाबुटातील लोकच संशोधन करू शकतात, धोतीवाले लोक संशोधन करू शकत नाही का? एक संन्यासी शास्त्रीय संशोधन करू शकत नाही का?… असे सवाल बाबा रामदेव यांनी केले आहेत. ही नवी अस्पृश्यता, नवी घृणा एक सामंतशाहीवादी विचारधारा आहे. आम्ही योग आयुर्वेदिक संशोधनासाठी १० हजार कोटी रुपयांचे इन्फास्ट्रक्चर उभे केले आहे. आधुनिक शास्त्राने संसोधनाचे काही ठोकताळे नियम तयार केले आहेत. तेच मानून आम्ही पुढे चालत आहोत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!