जळगाव जिल्ह्यातील निवासी नायब तहसीलदारांच्या बदल्या
रावेर (प्रतिनिधी)। काल रात्री उशिरा नाशिक विभागातील निवासी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शासनाने काढले आहे,
जळगाव जिल्हातील रावेर निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांची भूसावळ येथे ,पाचोरा येथील नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून संगमनेर जि.अहमदनगर येथे तर एरोंडोल संगायो नायब तहसीलदार मोहन सोनार यांची महसूल नायब तहसिलदार पाचोरा कडनोर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर बदली झाली आहे. पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील यांची पाचोरा निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. पारोळा येथील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांची नवापुर जि. नंदूरबार येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. अमळनेर नायब तहसीलदार आर. एस. चौधरी यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे.