दारू पिल्याने कोरोना होत नाही, सोशल मीडियावर फुकटचे सल्ले; तरुण बनताहेत व्यसनाधीन…..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव : ( प्रतिनिधी )। मालेगावचा काढा घेतल्याने, द्राक्ष खाल्ल्याने, जलनेती केल्याने,कांदा खाल्ल्याने, वाफ घेतल्याने सकाळी कोमट पाणी प्यायल्याने, कोरोना बरा होतो, असे अनेक गावठी उपचार करण्याचे सल्ले काही डॉक्टरांसह अनेक वैद्यांनी तसेच स्वयंघोषित डॉक्टरी सल्ला देणारे ,यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहेत. त्यापैकीच एक विचित्र सल्ला म्हणजे दारू पिणाऱ्याला कोरोना होत नाही.अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असते,या फुकटच्या सल्ल्यावर विश्वास ठेऊन , यामुळे तरुण पिढी दारूकडे वळू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे तरुण बनताहेत मद्यपी-सोशल मीडियावरील फुकटचे सल्ले महागात
दारूमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. तसेच, सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे कोरोनाचे विषाणू मरतात. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते, तर दारू मध्येही अल्कोहोल असते, दारू पिणाऱ्यांना कोरोना होत नाही, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असते, त्यामुळे दारू (मद्य )कोरोनावर रामबाण औषधच असल्याचा सल्ला काही व्यक्तींनी सोशल मीडियावर दिल्यामुळे बरेच तरुण दारू कडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. जे तरुण पूर्वी थोडी फार दारू घ्यायचे त्यांचेही प्रमाण वाढले आहे. कोरोना होऊ नये म्हणून जे दारू घेत होते. त्या दारू पिणाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने सोशल मीडियावर मिळालेला फुकटचा सल्ला फोल ठरत आहे
या बाबत डॉक्टरां कडून अधिक माहिती घेतली असता,सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल व इथेनॉलचे प्रमाण ७० टक्के असते. त्यामुळे सॅनिटायझर हाताला लावल्याने जीवाणू मरतात. दारूमध्ये जरी अल्कोहोलचे प्रमाण असले तरी कोणत्याही प्रकारची दारू कोरोनावर प्रभावी औषध ठरत नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा.